By  
on  

पुन्हा नव्या जल्लोषात घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा'चा नाद, सुबोध भावे लवकरच घेऊन येतायत हा कार्यक्रम

महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी मानली जाते. महाराष्ट्राची लोककलाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे. या लोककला आजच्या पिढीपर्यंत पोचवायचा प्रयत्न 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाद्वारे सोनी मराठी वाहिनी करत आहे. या कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. या कार्यक्रमात अनेक लोककलाकर आपली कला सादर करतात. या कार्क्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे पाहायला मिळणार आहेत. 

आता 'जय जय महाराष्ट्र माझा' हा कार्यक्रम नव्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शुक्रवार आणि शनिवार रात्री ९ ही कार्यक्रमाची नवी वेळ असेल. 

 

नवीन भागांची सुरुवात ही आंबेडकरी जल्लोषाने होणार असून संभाजी भगत, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे अशी दिग्गज मंडळी या भागात सादरीकरण करणार आहेत. 

लोककलांचा हा नजराणा पाहायला विसरू नका १७ जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive