By  
on  

पुन्हा रंगूया शिवा – सिध्दीच्या नात्याच्या नव्या रंगात , पाहूयात 'जीव झाला येडा पिसा'!

शिवा आणि सिध्दीच्या नात्याच्या पुढची कहाणी पाहण्यााठी रसिक प्रेक्षक खुपच आतुर झाले आहेत. कधी  एकदा जीव झाला येडा पिसाचे नवीन एपिसोड्स पाहायला मिळतायत असं प्रेक्षकांना झालं असतानाच नुकतंच शिवा-सिध्दीच्या केमिस्ट्रीचे थेट सेटवरुन हे फोटो समोर आले आहेत. दोघंही या करोना परिस्थितीत योग्य ती काळजी घेत आणि चेह-याला मास्क लावून आपल्या सीन्सची चर्चा करताना पाहायला मिळतायत.

गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळ देसाई, सिद्धी म्हणजेच विदुला चौघुले यांनी त्यांच्या पहिल्याच मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित, जलवा, मंगल यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळाली... आता हे लाडके कलाकार सज्ज झाले आहेत तुमचे मन जिंकायला... सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली. 

 

 शिवा आणि सिद्धीच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा येऊ लागला... गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली... यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्याचा ते खूप प्रयत्न देखील करत आहेत . तेंव्हा  पुन्हा एकदा शिवा – सिध्दीच्या नात्याच्या नव्या रंगात रंगून जाण्यासाठी पाहूयात २१ जुलैपासून रात्री ८.०० वा कलर्स मराठीवर जीव झाला येडापिसा, 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive