By  
on  

सासू-सुनेच्या धमाल केमिस्ट्री असलेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ ला झालं वर्ष पुर्ण

झी मराठीने आजवर अनेक वेगवेगळ्या ट्रॅकच्या मालिका चाहत्यांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ‘अग्गबाई सासूबाई’. सासूचा पुनर्विवाह करण्यासाठी सुनबाई कशी पुढाकार घेते, अशी एक सासू-सुनेची वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. 

 

 

शुभ्रा-आसावरीच्या हटके केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. याशिवाय निवेदिता जोशी-सराफ यांनी साकारलेली आसावरी आणि गिरीश ओक यांनी रंगवलेली अभिजीत या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाल्या आहेत.  आता या मालिकेने एक वर्षाचा टप्पा पार केला आहे. या मालिकेत आता हटके ट्रॅक समोर आला आहे. मवाळ आणि समजंस आसावरी आता बबड्या म्हणजेच सोहमला चांगलीच अद्दल घडवणार आहे. प्रेक्षकांना मागील सर्व भागांप्रमाणेच हा भागही आवडेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive