By  
on  

65 वर्षांवरील कलाकारांना शुटिंगला मज्जाव करण्याच्या नियमाबाबत शासनाने विचार करण्याची गरज: IMPA

करोनाचा प्रादुर्भाव पाहात महाराष्ट्र सरकारने तीन महिन्याहून अधिक काळ शुटिंग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता काही अटी शर्तींसह शुटिंगला परवानगी दिली असली तरी 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांना तसेच चाईल्ड आर्टिस्टना सेटवर येण्यास मनाई आहे.

 

 
पण यामुळे ज्येष्ठ कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशन (IMPPA) ने आता या संदर्भात आवाज उठवला आहे. IMPPAने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गाईडलाईन्स बदलण्याची मागणी केली आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, ‘ज्येष्ठ कलाकारांना सहज रिप्लेस करणं शक्य नाही. याशिवाय आसपास च्या हॉटेलमध्ये सदस्यांना थांबवणं कठीण आहे. याशिवाय अ‍ॅम्ब्युलन्स 24 तास सेटवर ठेवता येणंही कठीण आहे त्यामुळे हे निर्बंध सैल करावेत अशी मागणी IMPA ने केली आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive