By  
on  

अरुंधती समोर येणार का अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचं सत्य... ?

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे  काय करते या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आपल्या आईचीच छबी आज प्रत्येकजण या मालिकेतल्या आईत पाहतो. अरुंधती साकारणा-या मधुराणी गोखले-प्रभूलकरने या आईच्या भूमिकेला तंतोतंत न्याय दिला आहे.  दैनंदिन आयुष्यात घडणा-या अगदी छोट्या मोठ्या प्रसंगावर भाष्य करते. सध्या या मालिकेत जल्लोषाचं वातावरण आहे. निमित्तही तसं खास आहे.अरुंधती आणि अनिरुध्द यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि संपूर्ण कुटुंबिय मोठ्या थाटात तो साजरा करतायत.

. यानिमित्ताने सारं कुटुंब एकत्र आलंय. घरातल्या लहान मंडळींसोबतच मोठ्यांनीही धमाल उडवून दिलीय. खास बात म्हणजे आई अर्थातच अरुंधतीनेही मस्त जुन्या गाण्यांवर ताल धरलाय. यश, ईशा आणि अभिषेक, गौरी सर्वचण धम्माल करतायत. तर आजी-आजोबांचा उत्साहसुध्दा वाखाणण्याजोगा आहे. 

 

एकीकडे आनंदाचं वातावरण असताना या सुखाला गालबोट लागणार आहे ते संजनाच्या फोनमुळे. ऐन कार्यक्रमात संजना अनिरुध्दला फोन करते आणि फोन स्पिकरवर असतो...मग ती अनिरुध्दला मला फसवायचा प्रयत्न करु नको, असं म्हणते आणि सा-यांच्याच चेहरे फिके पडतात. आता आई-आप्पा , अरुंधती आणि मुलांना  का अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचं सत्य..समजणार का...पुढे काय होणार...हे जाणून घ्यायची तुम्हाला सुध्दा नक्कीच उत्सुकता असेल.. त्यासाठी न चुकता पहा ‘आई कुठे काय करते’ दररोज रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive