झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेने आता चांगलाच वेग घेतला आहे. सई आणि आदित्यच्या भांडणापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आता प्रेमाचं वळण घेतेय की काय असं वाटत असतानाच एक नवाच पेच समोर उभा राहतोय. सईच्या आईवडीलांनी सईचं लग्न तोलामोलाच्या घरातच व्हावं म्हणून कंबर कसलीये. आणि इथे आदित्यकडेही नेमकी स्थळांची शोधाशोध सुरु झालीये.
आदित्य आणि सई दोघांनाही हे बघण्याचे कार्यक्रम मान्य नाहियेत, पण घरचे हट्टाला पेटलेत. मग ह्या संकटात एकमेकांना साथ देण्यासाठी सई आणि आदित्य स्थळ पहायला तयार झालेत. हा कांदेपोह्यांचा खमंग कार्यक्रम रंगणार आहे, ‘चटकदार चवदार’ हाॅटेलमधे! गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या भागात ही गंम्मत पहायला मिळणार आहे. तेव्हा चुकवू नका, माझा होशील ना!