'माझ्या नव-याची बायको' मालिकेत लॉकडाऊननंतर आता नवनवे ट्विस्ट येऊ लागले आहेत आणि रसिकांनासुध्दा ते प्रचंड आवडतायत. तुम्हाला माहितच असेल सौमित्रने पिंकी या स्त्रीच्या वेषात येऊन राधिकाला त्रास देणा-या गुरुनाथला धडा शिकविण्यासाठी सर्वांसमोर मारलं होतं. पण पिंकी ही शनायाची मेत्रिण असल्याचंच फक्त त्याला माहित होतं. पण खरंतर पिंकी ही कोणतीही स्त्री नसून तो सौमित्र होता हे मायाने त्याच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानंतर माया व गुरुनाथने या पिंकीचं बिंग फोडण्याचा विडाच उचलला.
माफी मागण्याच्या बहाण्याने गुरुनाथ आणि मायाने पिंकी उर्फ सौमित्रला आपल्या जाळ्यात ओढलं. तो त्यांच्याकडे गेल्यावर त्याला बाहेर पडण्याचा मार्गही त्यांनी बंद केला. राधिका सौमित्रच्या काळजीने इथे येईल आणि तिच्यासमोर व मिडीया आणि कंपनीच्या क्लायेंट्समोर आपण पिंकींचं बिंग फोडू असा गुरुनाथ आणि मायाचा डाव आता यशस्वी होताना दिसतोय.
आता मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.