By  
on  

उष्टी हळद अरुंधतीचा संसार रंगवणार की मोडणार..?

अरुंधतीसमोर संजना आणि अनिरुध्दचं यांच्या नात्याचं सत्य येणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. अनिरुध्दने मोठा मुलगा अभिषेकला आपल्या गोड बोलण्याने गुंडाळून टाकलं आहे. इतके दिवस बाबांचं संजनासोबतचं अफेअ कळल्यावर त्यांचा राग-राग करणा-या अभिषेकचा विश्वास संपादन करण्यात अनिरुध्दला यश आलं आहे. त्याची अरुंधतीसोबतची फसवणूक सुरुच आहे. संजनाच्या मर्जीसाठी तो तिच्यासोबत दुसरं  लग्न करायला सज्ज आहे आणि त्याच्या या मार्गातला अभिषेकचा अडसरसुध्दा आता दूर झालाय. 

 'आई कुठे काय करते'. ह्या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं , प्रत्येक भागांची नेहमीच उत्सुकता असते.. आजी-आजोबा, आई-बाबा, नातवंडं, इतर नातेवाईक  असा भरलेला परिपूर्ण परिवार पाहणं म्हणजे एक सोहळाच ठरतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. 

सध्या या मालिकेत अरुंधती आणि अनिरुध्द देशमुख यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त ग्रॅण्ड सेलिब्रेशन आणि या दोघांचं पुन्हा लग्न लावून देण्याचं घाट संपूर्ण कुटुंबाने घातला आहे. पण संजना यावर मीठाचा खडा टाकणार असं हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. 

 

 

 

ऐन हळदीत अरुंधतीने हे पाहिल्यावर ती काय करणार...कशी रिर्एक्ट होणार आणि पुढे नेमकं कथानक काय वळण घेणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता रंगली  आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive