By | 22-Feb-2019

‘ती फुलराणी’ मालिकेत होणार, एका ज्येष्ठ कलाकाराची एंट्री पाहा कोण आहेत हे अभिनेते

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्याकेल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाहीवृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. जगदीश महापात्रे यांनीमानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे.

 

ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतीलयाचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना  आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुखकुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

.....

Read More

By | 15-Feb-2019

नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक मंगळसूत्र भेट देऊन शौनक सेलिब्रेट करणार लव्हस्टोरी

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयारझालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाया अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.

घरच्यांचा विरोधात जाऊन आणि देवयानीसोबत असलेले नाते तोडून शौनकने मंजूसोबत लग्नाचा ठोस निर्णय घेऊन तो संपूर्ण जबाबदारीने पूर्ण करुन मंजूशी लग्न केल्यामुळे देवयानीच्या मनात राग आणिअस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता आणि विश्वासघात झालेल्याची भावना देवयानीला शांत बसू देणार नाही आणि याचाच बदला घेण्यासाठी देवयानी वेगवेगळ्या मार्गाने शौनक-मंजूच्या संसारातलुडबूड करुन मंजूला मानसिक त्रास देण्याच्या विचारात आहे/प्रयत्नात आहे.

सौभाग्यवतींसाठी प्रेमाचे प्रतिक हे मंगळसूत्र असते. मंगळसूत्रामुळे त्यांचे सौंदर्य अजून जास्त खुलून दिसते. पण या दागिन्याचा वापर देवयानी मंजूला त्रास देण्यासाठी कसं करते हे या मालिकेत पाहायलामिळणार आहे. शौनकच्या नावाचं मंगळसूत्र देवयानी घालते आणि नात्याने बायको असलेल्या मंजूला शौनकच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे आहे पण यात तिचं काही चुकतंय का असा प्रश्न तिच्या मनातउपस्थित झाला आहे. यात मंजूचं काहीही चुकत नसून मंगळसूत्र नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक आहे. प्रेम नसलेल्या नात्यात हे कुरुप दागिन्यासारखं आहे, अशा प्रेमळ शब्दाने तिची समजूत काढूनशौनक मंजूला मंगळसूत्र भेट म्हणून देतो आणि हा क्षण मंजूसाठी आनंदाचा क्षण ठरतो.

या दोघांच्या नात्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांसाठी नेहमी एकत्र येणा-या मंजू आणि शौनकच्या नात्याची लव्हस्टोरीचा एक तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारीला नक्की पाहा सोनीमराठीवर.

.....

Read More

By | 17-Jan-2019

मंजूने उचलला आहे शिक्षणाचा विडा

शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत......

Read More