सुड आणि कारस्थानांचा नवा तडका घेऊन ‘मिर्झापुर 2’ चा ट्रेलर रिलीज

By  
on  

उत्तरेतील राजकारणाच्या रंगात रंगलेल्या मिर्झापुरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पहिल्या सीझनमध्ये अमाप लोकप्रियता मिळवलेल्या ‘मिर्झापुर 2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. गुन्हेगारी विश्वावर आधारित या सिरीजमध्ये भरपुर अ‍ॅक्शन दिसणार आहे.  ‘मिर्झापूर २’मध्ये गुड्डू, कालीन भैय्या आणि मुन्ना यांच्यात जुगलबंदी रंगताना दिसणार आहे. 

 

 

मिर्झापुर 1 मध्ये गुड्डूला गोळ्या लागल्या असतात. तसेच त्याच्य पत्नीचाही यात मृत्यू होताना दिसतो आहे. आता गुड्डू या सगळ्याचा सुड घेणार आहे. ‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २३ ऑक्टोबरपासून ‘मिर्झापूर २’ अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share