‘समांतर’मधील पहिल्याच थरारक सीनचं असं झालं होतं शुटिंग, पाहा व्हिडियो

By  
on  

मागील वर्षी रिलीज झालेल्या 'समांतर' या वेब सिरीजने लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या वेबसिरीजमधील गुढकथेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सिरीज अधिक रंगतदार केली. 

 

 

या सिरीजच्या दुस-या पार्टची उत्सुकता अधिक आहे. याचदरम्यान वेबसिरीजचा पहिलाच सीन कसा चित्रित झाला याचा व्हिडियो समोर आला आहे. यामध्ये थरारक स्टंट कसा चित्रित केला हे पाहताना अंगावर शहारा आल्याशिवाय रहात नाही. पहिल्या सीझनच्या यशानंतर ‘समांतर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागाची रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.  या आगामी सीरिजच्या माध्यमातून पहिल्या भागाप्रमाणेच  स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share