सत्तेच्या रक्तरंजित खेळात आता कोण जिंकणार? ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2 चा ट्रेलर समोर

By  
on  

‘राजकारण, सत्ता, नाती यातील गुंतागुंत आणि रहस्य यावर बेतलेली सिरीज म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’. 2019 मध्ये आलेल्या या वेबसिरीजची प्रचंड चर्चा झाली होती. या सिरीजमध्ये असलेल्या दमदार मराठमोळ्या स्टारकास्टने तर सगळ्यांचचं लक्ष वेधलं होतं. सिरीजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आलेल्या ट्वीस्टमुळे आता या सिरीजमध्ये पुढे काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

तर आता बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ चा ट्रेलर आता समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये गायकवाड बाप-लेकीच्या नात्याला कडवट वळण मिळताना दिसत आहे. मुलाच्या मृत्यूने अस्वस्थ झालेला अमेय गायकवाड सुड घेण्यात यशस्वी होतो का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या सिरीजच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन, लेखन करणारे नागेश कुकुनूर यांनीच दुसऱ्या सिझनचही दिग्दर्शन केलं आहे.

Recommended

Loading...
Share