पुन्हा येणार जुई आणि साकेत, ‘आणि काय हवं 3’ ची नांदी, पाहा टीजर

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल आहेत यात वाद नाही. ही जोडी आणि काय हवं या वेबसिरीजमधून प्रिया आणि उमेश ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता या जोडीचा सुपरहिट रोमॅण्टीक वेबसिरीज आणि काय हवंचा 3 रा सीझन येतोय.   दिग्दर्शक वरुण नार्वेकर या सिरीजचं दिग्दर्शन करत आहेत विशेष म्हणजे लेखनही त्यांचंच आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

 

या सिरीजच्या पहिल्या दोन्ही सीझनला कमाल प्रतिसाद मिळाला. आता प्रियाने नुकताच तिस-या सीझनचा टीजर शेअर केला आहे. यात जुई आणि साकेत पुन्हा अतरंगी अंदाजात दिसत आहेत. चाहत्यांना हा सीझनही नक्कीच आवडेल यात शंका नाही. एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि अ मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन वर 'आणि काय हवं'चा तिसरा सीझन लवकरच येत आहे. 'आणि काय हवं'चा पहिला सिझन आला आणि बघता बघता त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. जुई आणि साकेत प्रत्येकालाच आपल्या घरातीलच एक वाटू लागले.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

 

अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. आता परत ते आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचे रुसवे फुगवे, त्यांच्या आयुष्यातील गंमतीजंमती, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वरूण नार्वेकर दिग्दर्शित या गोड आणि गुणी जोडप्याची गोष्ट असलेल्या ‘आणि काय हवं' सिझन ३ चा ट्रेलर २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share