By  
on  

‘सेक्रेड गेम्स २’ मधील गणेश भाईचा जलवा पुन्हा दिसणार, नेटफ्लिक्सने केले पोस्टर शेअर ‘

वेबसिरीजच्या विश्वात स्वत:चं असं स्थान निर्माण करणारा शो म्हणजे सेक्रेड गेम्स. हटके कथानक, प्रभावशाली व्यक्तिरेखा यामुळे या वेबसिरीजने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता या वेबसिरीजचा सिक्वेल कधी येणार याची रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमधून नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा गणेश गायतोंडेच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ‘पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात!’, असं कॅप्शन असलेल्या पोस्टमध्ये नवाज सुट्मधील लूकमध्ये दिसत आहे. यासोबत सरताज म्हणजे सैफ अली खानचं पोस्टरही रिलीज केलं आहे. या पोस्टरला ‘सरताज को सिस्टीम बदलना है तो खेल तो खेलना ही पडेगा’ असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

Pichli baar kya bola tha Ganesh bhai ko? Aukaat!

A post shared by Netflix India (@netflix_in) on

वेबसिरीजमध्ये आता कल्की कोचलिनही दिसणार आहे. तिच्यासोबत रणवीर शौरी हा देखील हा शोचा भाग असेल. हा पार्ट खुद्द अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. सेक्रेड गेम्स,ची कथा लेखक विक्रम चंद्र यांच्या ‘सेक्रेड-गेम्स’ या पुस्तकावर अवलंबून आहे. या पार्टचं शुटिंग मार्चमध्ये सुरु झालं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive