आलोक राजवाडे घेऊन येतोय ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’

By  
on  

सध्या शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे. पण सगळ्या धावपळीत मानसिक आरोग्यावर मात्र दुर्लक्ष होतं. हाच कळीचा मुद्दा घेऊन अभिनेता, दिग्दर्शक आलोक राजवाडे हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

 

‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ ही शॉर्टफिल्म सिरीज आलोक चाहत्यांसाठी घेऊन येतो आहे. या सिरीजचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विषय खोल या वेब चॅनेलवर ही सिरीज दिसणार आहे. प्रिया, महेश, अवंती, साईनाथ, अर्जुन, अभी-अनू या व्यक्तिरेखांची गोष्ट यावर दिसणार आहे. आता ‘नवं दिग्दर्शन’ Coming soon हे कॅप्शन देत त्याने या सिरीजचं पोस्टर शेअर केलं आहे.

Recommended

Loading...
Share