By  
on  

 दिसणार समाजाचा लपलेला चेहरा ?, ‘पाताल लोक’चा टीझर प्रदर्शित 

अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेली वेब सिरीज 'पाताल लोक' मे महिन्यात प्रदर्शित होत हे. त्यातच अनुष्का या वेब सिरीजचे पोस्टर आणि टीझर तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करतेय. 
नुकतच अनुष्काने 'पाताल लोक' या वेब सिरीजचा पोस्टर पोस्ट केला होता. आणि आता या सिरीजचा टीझरही पोस्ट केला आहे. या वेब सिरीजच्या या नव्या टीझरमध्ये जगाचा लपलेला चेहरा आणि त्याचं भयानक रुप पाहायला मिळेल.  

अमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकताच 'पाताल लोक' या वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरपाहून ही एक थरारक वेब सिरीज असल्याचं पाहायला मिळतय. 'क्लीन स्लेट' फिल्म्सची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजचा ट्रेलर येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होईल. येत्या 15 मे रोजी ही वेब सिरीज प्रदर्शित होईल. हा थरारक टीझर पाहिल्यानंतर ट्रेलर कसा असेल याचीच उत्सुकता आता आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive