‘सैराट’ची आर्ची आता पुन्हा चर्चेत आली आहे. ‘सैराट’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या रिंकूला पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळतय. निमित्त आहे तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजचं. रिंकूने ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमधून वेब विश्वात पदार्पण केलं आहे. या वेब सिरीजमध्ये नेत्रा पाटीला नावाच्या मिडल क्लास मुलीची भूमिका रिंकूने साकारली आहे. अभिनेत्री लारा दत्ता आणि इतर अनेक कलाकार या वेब सिरीजमध्ये आहेत. मात्र रिंकूच्या भूमिकेचं भरपुर कौतुक होत आहे. नुकतच रिंकूने यासाठी या वेब सिरीजशी जोडल्या गेलेल्या तीन महत्त्वाच्या व्यक्तिंचे आभार मानले आहेत. या तीन व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून या सिरीजचे दिग्दर्शक आहेत. रुची नारायण, ताहीर शब्बीर आणि आशुतोष शाह या तिनही दिग्दर्शकांचे रिंकूने आभार मानले आहेत.
नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, “नेत्रा पाटील ही भूमिका मी करु शकते यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. मला ही जबरदस्त भूमिका साकारण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद. तुमच्या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. माझी काळजी घेतल्याबद्दल आणि मला कुटुंबासारखं वागवण्यासाठीही धन्यवाद.”
सध्या वेब प्लॅटफॉर्म प्रसिद्ध असलेल्या वेब सिरीजमध्ये रिंकूची ‘हंड्रेड’ ही वेब सिरीजही चांगलीच चर्चेत आहे. यातील भूमिकेसाठी रिंकूवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.