By  
on  

 रिंकू राजगुरुच्या वेब सिरीजचा लवकरच येणार दुसरा सिझन 

‘हंड्रेड’ या हिंदी वेब सिरीजमधून सैराट फेम रिंकू राजगुरुने वेब विश्वात पदार्पण केलं. रिंकू राजगुरुने या वेब सिरीजमध्ये साकारलेली नेत्रा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. रिंकूने या वेब सिरीजमध्ये नेत्रा पाटील ही मिडल क्लास मुलगी साकारली आहे.अभिनेता मकरंद देशपांडे यांचीही या वेब सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी बिझनेसमन सत्तू अंकल  ही भूमिका यात साकारली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या वेब सिरीच्या दुसऱ्या सिझनचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, “पहिल्या सिझनमध्ये माझा कॅमियो होता. पण दुसर सिझनही येणार आहे. असं मेकर्सनी मला सांगीतलं आहे.’

 
आता या सिरीजचा दुसरा सिझनही येत असल्याने त्यात काय पाहायला मिळेल याची उत्सुकता आहे. या वेब सिरीजमधून अभिनेत्री लारा दत्तानेही वेब सिरीज विश्वात पदार्पण केलं आहे. रिंकू आणि लाता दत्ता यांच्या भूमिकेभोवती ही कथा फिरते. रिंकूने साकारलेली नेत्रा आणि तिची लारा दत्ताने साकारलेली एसीपी सोम्यासोबत कशी भेट होते? त्या भेटीनंतर नेत्राचं आयुष्य कसं बदलतं हे या वेब सिरीजमध्ये पाहणं रंजक ठरतं.पहिल्या सिझनचा शेवट अपूर्ण दाखवला असल्याने आता दुसऱ्या सिझनमध्ये ही कथा कशी पुढे जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Behind the scenes

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रुचि नारायण, आशुतोष शहा, ताहीर शब्बीर यांनी या शोचं सह दिग्दर्शन केलं आहे. शिवाय करण वाही, सुधांशू पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे, ऋषीकेश जोशी ही महत्त्वाची स्टारकास्ट या वेब सिरीजमध्ये आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive