By  
on  

सिध्दार्थ मेननने त्या मेकअप लुकमधील फोटो केले पोस्ट, ‘बेताल’ मध्ये साकारतोय महत्त्वाची भूमिका

किंग खान शाहरुखच्या रेड चिलीजच्या नेटफ्लिक्स वरील ‘बेताल’ या वेब सिरीजची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अभिनेता सिध्दार्थ मेनन आणि जितेंद्र जोशी हे मराठी कलाकारही या वेब सिरीजमध्ये आहेत. 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजला मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. एक झॉम्बी हॉरर सारखा थरार या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतोय.

 

जवानांच्या बाटलीयनमधील एक तरुण जवान सिध्दार्थ मेनन यात साकारतोय. मात्र या वेब सिरीजसाठी त्याला चित्र विचीत्र चेहऱ्याचा मेकअपही करावा लागला आहे. आणि याच मेकअप लुकमधील फोटो सिध्दार्थने पोस्ट केले आहेत. 

शिवाय या सिरीजच्या चित्रीकरण दरम्यानेची ऑफस्क्रिन मस्तीही त्याने फोटो रुपात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सिध्दार्थ लिहीतो की, “आम्ही सगळे हसतोय. आमचे मेसेज बॉक्स मेसेजेसनी भरले आहेत. तुमच्या प्रेमासाठी सगळ्यांना धन्यवाद.”  असं म्हणत सिध्दार्थने प्रेक्षकांचे प्रतिक्रियेसाठी आभार मानले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive