By  
on  

सदावर्ते आणि गावस्कर कुटूंबात साजरा होतोय गुढीपाडव्याचा सण

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'शुभमंगल ऑनलाईन' ही मालिका चांगलच मनोरंजन करत आहे. शंतनु आणि शर्वरीची ऑनलाईन भेट झाल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदलत जात हे या मालिकेत पाहायला मिळतय. सध्या या मालिकेत सण-उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतय. 

नुकतच या मालिकेत गुढीपाडवा स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला आहे. तेव्हा सदावर्ते आणि गावस्कर कुटुंब आता गुढीपाडवा साजर करत असल्याचं पाहायला मिळणार आहे. यासाठी या कलाकारांनी खास नटुनथटून शूट केलेलं आहे. 

या मालिकेत शंतनुची भूमिका साकारणाऱ्या सुयश टिळकने या खास भागाचे फोटो पोस्ट केले आहेत. सुयश या पोस्टमध्ये लिहीतो की, "सदावर्ते आणि गावस्कर कुटूंबात साजरा होतोय 'गुढीपाडवा'...तुम्हीसुद्धा या लॉकडाउन मधील पहिल्या सणात सहभागी व्हा,आणि तुमच्या या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या आठवणी नक्की सांगा."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive