By  
on  

विक्रांत-इशाच्या लव्हस्टोरीत येणार राजनंदिनी, लवकरच ‘तुला पाहते रे’मध्ये होणार एन्ट्री

'तुला पाहते रे' ही विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीची वयाची बंधनं ओलांडून जुळलेली ही प्रेमकहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अनेक मनोरंजक वळणं या मालिकेत पाहायला मिळतायत. नुकताच काही आठवड्यांपूर्वी विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. इशा ही राजनंदिनीचा पुर्नजन्म असल्याचा आटापीटा विक्रांत करतोय, असं सध्याचं कथानक आहे. लवकरच या मालिकेत राजनंदिनीची एन्ट्री होणार आहे. सर्वांनाच राजनंदिनीला म्हणजेच ही भूमिका साकारणा-या अभिनेत्री शिल्पा तुळसकरला मालिकेत पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा तुळसकरने 'तुला पाहते रे' मालिकेत राजनंदिनीची एन्ट्री होण्यासाठी  प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु यापलिकडे शिल्पाने या भूमिकेबद्दल किंवा एन्ट्रीबद्दल अधिक कुठलाच खुलासा केलेला नाही.

tu

‘तुला पाहते रे’ मालिकेच्या टायटल ट्रॅकमध्ये शिल्पा तुळसकर ही सावलीसारखी झळकली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच विक्रांतची पहिली पत्नी म्हणून शिल्पा तुळसकर या मालिकेत झळकणार अशी चर्चा रंगली होती. परंतु अद्याप राजनंदिनीची रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला शिल्पाच्या एन्ट्रीची वाट पाहावी लागेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive