By  
on  

'तुला पाहते रे' मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लाडकी मालिका 'तुला पाहते रे' अडचणीत सापडली आहे, निवडणूक आयोगाकडून या मालिकेला नोटीस बजावण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेत निवडणूकीचा प्रचार करण्यात आल्याने या मालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती मिळतेय.

'तुला पाहते रे' या मराठी मालिकांसह अनेक हिंदी मालिकांविरोदात कॉंग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचे प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर ‘तुला पाहते रे’मध्ये ‘मेक इन इंडिया’चा प्रचार केला जात आहे.

https://twitter.com/sachin_inc/status/1114755067226148864

याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्‍विट केले होते. त्‍यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटले होते- 'भाजप दिवसेंदिवस खालच्‍या दर्जाचे राजकारण करत आहे. आता मालिकांचा उपयोग प्रचार करण्‍यासाठी केला जात असून याबाबत निवडणूक आयोगाकडे आपण भाजपविरोधात तक्रार करत असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive