By  
on  

दुहेरी मनोरंजनासाठी येतोय विश्वास जोशी दिग्दर्शित ‘घ्ये डब्बल’

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच चाकोरीबाह्य विषयांवर सिनेमे येतात. त्या विषयाचा सखोल अभ्यास करुन तो सिनेमा पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडून केला जातो. ‘What’s up लग्न’ या सिनेमाच्या यशानंतर ‘घ्ये डब्बल’ या आपल्या आगामी मराठी सिनेमातून असाच एक नवीन विषय दिग्दर्शक विश्वास जोशी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. ‘घ्ये डब्बल’ या हटके शिर्षकामुळे या सिनेमाची खासियत काय असणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज  महेश मांजरेकर व नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत गणरायाच्या चरणी या सिनेमाच्या लेखनाची प्रत ठेवण्यात आली. या साऱ्यांच्या शुभेच्छा आणि गणरायाचा आशिर्वाद या सिनेमाला लाभेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात. ‘शेक्सपिअर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या जगप्रसिद्ध नाटकावरून प्रेरित असणाऱ्या या सिनेमाचे लेखन हृषीकेश कोळी व विश्वास जोशी यांनी केले आहे.

या सिनेमात दोन नायकांचे डबल रोल असणार आहेत. हे दोन नायक कोण असणार? आणि सिनेमात इतर किती कलाकार पाहायला मिळणार याबबातची सविस्तर माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे. पण दुहेरी मनोरंजन होणार एवढं मात्र नक्की!

‘घ्ये डब्बल’ हा सिनेमा पुढील वर्षी 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive