By  
on  

Birthday Special: स्टाईल आयकॉन अभिनेता वैभव तत्त्ववादीचे हे खास लूक्स

मराठी सिनेसृष्टीतील टॉल, डार्क आणि हॅंडसम अभिनेता म्हटलं की, वैभव तत्त्ववादी डोळ्यासमोर येतो. सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याबरोबरच त्याच्या फॅशन स्टाईलने आजच्या तरूणाईला भुरळ पाडली आहे. त्याचं स्वत:चं एक फॅशन स्टेटमेन्ट आहे. यासाठी त्याचं नेहमीच कौतुक होतं. मुलींची तर त्याला नेहमीच पसंतीची पावती मिळते.

मराठीसोबतच हिंदीतही त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आज 25 सप्टेंबर हा वैभवचा वाढदिवस. चला तर, यानिमित्ताने पिपींगमून मराठीवर वैभवचे खास स्टायलिश लूक्स पाहूयात

वैभव या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये फारच गुणी आणि शानदार दिसतोय.

 

व्हाईट पॅण्ट आणि आडव्या  स्ट्रिप्सच्या या कॅज्युअल लूकमध्ये वैभव भलताच स्टायलिश दिसतोय.

 

ब्लॅक जीन्स आणि रेड कलरच्या लेदर जॅकेटमधील वैभवला पाहून तरुणी नक्कीच फिदा होणार.

 

या कॅज्युअल लूकमध्ये वैभव अगदी कूल डूूड दिसतोय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

 

महत्त्वाचं म्हणजे वैभवने मागच्यावर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये या पारंपारिक वेशभूषेत रॅम्प वॉक केला होता. पारंपारिक शेरवानी आणि कोल्हापुरी चप्पलमध्ये तो फारच रुबाबदार दिसतोय.

या ब्लेझर लूकमध्ये वैभव फक्त स्टायलिशच नाही तर अगदीच भारी लूकमध्ये एखादा बिझनेसमनचं शोभतोय.

अभिनेता वैभवने साकारलेला कॉफी आणि बरंच काही सिनेमातील प्रियकर खुपच लोकप्रिय ठरला तर बाजीराव-मस्तानी या बॉलिवूड सिनेमातील वैभवने साकारलेली चिमाजी अप्पांची तडफदार भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. तसंच मि. अॅण्ड मिसेस सदाचारी, सुराज्य, व्हॉट्सअप लग्न, चिटर, कान्हा, शॉर्टकट, हंटर आदी अनेक सिनेमांमधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.

पिपींगमून मराठीतर्फे गुणी अभिनेता वैभव तत्त्ववादीला वाढदिवसानिमित्त आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive