By  
on  

 पाठक बाईंना सहकलाकारांनी अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेतील पाठक बाई आणि राणा दाची जोडी त्यांच्या भूमिका हे सगळच त्यांना इतके आवडलं की त्यांनी या मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. आणि याच पाठक बाईंचा अर्थात ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने या मालिकेतही सहकलाकारांनी तिला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत. 

यात सगळ्यात आधी राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीनेही शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकने अक्षयासोबतच्या विविध आठवणी असलेल्या फोटोंचा कोलाज पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हार्दिक लिहीतो की, “आयुष्य खूप सुंदर वाटतं जेव्हा एक गुणी अभिनेत्री तुम्हाला कोस्टार आणि जवळची मैत्रीण म्हणून लाभते. वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षया. तू सोबत असल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो.” हा खास बर्थडे मेसेज हार्दिकने अक्षयासाठी लिहीला आहे.

तर या मालिकेतील आणखी एक सहकलाकार राज हंचनाळेने देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथम त्याने अक्षयासोबतचे खास सेल्फि पोस्ट केले. आणि नंतर एक खास आठवण पोस्ट केली आहे. त्याने तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवरील एक सेल्फि व्हिडीओ पोस्ट केला आहे. मालिकेच्या सीन दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. 

या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापुरात होत असतं. मात्र लॉकडाउनमुळे या मालिकेचही चित्रीकरण बंद आहेत. मात्र घरात राहून हे कलाकार एकमेकांची आठवण काढत असल्याचं हे चित्र आहे.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive