महागुरुंची लेक आता थेट दाक्षिणात्य इंडस्ट्रीत, राणा डुगुबूत्तीसोबत झळकणार श्रिया पिळगावकर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील महागुरु सचिन पिळगावकर आणि चतुरस्त्र अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक श्रिया बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर आत्ता दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय.एक फ्रेश टॅलेंट म्हणून तिच्याकडे नेहमी पाहिलं जातं. फॅन सिनेमात ती शाहरुख खानच्या नायिकेच्या भूमिकेत झळकली होती.फक्त सिनेमाच नाही, तर अनेक जाहिराती व वेबसिरीजमध्येसुध्दा श्रियाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. तसंच काही शॉर्टफिल्मसच्या दिग्दर्शनाची धुरासुध्दा तिने सांभाळलीय.

दाक्षिणात्य सिनेमा हाथी मेरे साथी हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात श्रिया सुपरस्टार डग्गुबतीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमाची प्रेरणा १९७१ साली आलेल्या राजेश खन्ना यांच्या सिनेमावरुन घेण्यात आली आहे.

यापूर्वी या सिनेमात राणा डग्गुबतीसोबत कल्की कोचलीन भूमिका साकरणार होती. मात्र आता कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगूमध्ये ‘अरण्या’ आणि तामिळमध्ये ‘कादन’ असं सिनेमाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

श्रियाच्या कारकिर्दीतली ही नवी इनिंग पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.

Recommended

Loading...
Share