प्रसाद आणि मंजिरी ओकच्या मयंकने दहावीत मिळवले ९० टक्के, शेअर केली पोस्ट

By  
on  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा  दहावीचा निकाल आज जाहीर झाला. करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास बरीच दिरंगाई झाली. मराठी सिनेसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक  प्रसाद ओकचा मुलगा मयंक ओक यंदा दहावीला होता. त्याच्याही निकाल लागला असून प्रसादने सोशल मीडियावर त्याच्या रिझल्टनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तर त्याची पत्नी मंजिरी ओकनेसुध्दा मयंकचं दहावीच्या परिक्षेतलं घवघवीत यश सोशल मिडीयावर आनंद व्यक्त करत साजरं केल आहे. 

‘चि. मयंक ओक.. दहावी परीक्षेत ९० टक्के.. अभिमान आणि प्रेम’, अशी पोस्ट प्रसादने लिहिली. याचसोबत त्याने मयंकचा फोटो पोस्ट केला. 

संपूर्ण सिनेसृष्टीसह आणि चाहत्यांसह मयांक प्रसाद ओकवर हे  घवघवीत यश संपादन केल्यानिमित्त कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Recommended

Loading...
Share