'घाडगे एण्ड सून' फेम या अभिनेत्रीला येत आहे या गोष्टीची आठवण

By  
on  

सध्या मनोरंजन विश्वाच्या कामाला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स अद्याप बंदच आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव सध्यातरी प्रेक्षकांना घेत येत नाहीय. मात्र ओटीटीवर विविध सिनेमे प्रदर्शित होत असल्याने घरबसल्या ते पाहता येत आहे. तरीही सिनेमागृहात सिनेमे पाहण्याची मजा काही वेगळीच असते. हीच मजा सध्या मिस करत आहे अभिनेत्री भाग्यश्री लिमये.

भाग्यश्रीने नुकताच सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या हातात पॉपकॉर्न दिसत आहे. शिवाय हा फोटो सिनेमागृहातला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "होय मी तुला मिस करतेय."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yes, I miss you!

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye) on

 

म्हणजे सध्या सिनेमागृहात सिनेमे पाहणं आणि विशेषकरून पॉपकॉर्न खाण्याची आठवण भाग्यश्रीला येत असल्याचं ती या पोस्टमध्ये सांगते

'घाडगे एण्ड सून' या मालिकेतून भाग्यश्री लोकप्रिय झाली. सोशल मिडीयावरही भाग्यश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Recommended

Loading...
Share