By  
on  

'फर्जंद' फेम अंकितसाठी हा दिवस मराठी फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या वाढदिवसासारखा

'फर्जंद' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. कोंडाजी फर्जंद यांचा इतिहास आणि उत्तम कलाकारांची फौज या सिनेमाला लाभली होती. मुख्य म्हणजे फर्जंदची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित मोहनच्या अभिनयाचही कौतुक झालं. अंकितचा अभिनय आणि त्याची शरीरयष्ठीने प्रेक्षकांना आकर्षित केलं. 

नुकतीच अंकितने 'फर्जंद' सिनेमाची आठवण शेयर केली आहे. या सिनेमाच्या फर्स्ट टेकला मिळालेला प्रतिसाद त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे. हा सिनेमा त्याच्या करियरमधील महत्त्वाचा सिनेमा असल्याचं तो नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये सांगतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I will always celebrate this day as my birthday in Marathi Film Industry because my 1st take started with round of applause & tears in eyes and that’s worked like a nitrogen booster to me... फ़र्ज़ंद फ़िल्म से जुड़े हर इंसान को कोटि कोटि धन्यवाद और सभी प्रशंसकों को सादर प्रणाम प्यार ओर आशीर्वाद हमेशा बनाए रखे हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय #farzand #streamingonhotstar

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

 

अंकितने फर्जंद सिनेमाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "मी नेहमीच हा दिवस माझा मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील वाढदिवस म्हणून साजरा करेल. कारण माझ्या पहिल्या टेकची सुरुवात टाळ्यांनी आणि अश्रूंनी झाली होती. फर्जंद सिनेमाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तिला कोटी कोटी धन्यवाद आणि चाहत्यांनाही नमस्कार. प्रेम आणि आशिर्वाद असाच राहू देत. हर हर महादेव.छत्रपती शिवाजी महाराज की जय"

अंकितने याआधी हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. हिंदी मालिकांमधून करियरची सुरुवात केल्यानंतर अंकितने हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही काम केलं. 'फर्जंद'सह 'फत्तेशिकस्त','मन फकिरा' या मराठी सिनेमांमध्येही तो झळकला आहे. 'एक थी बेगम' या वेब सिरीजमध्येही त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive