मुंबई हायकोर्टाने उठवली 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांची शूटींगला न जाण्याची बंदी

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमध्ये ठप्प झालेलं मनोरंजन विश्वाच्या कामाला आणि चित्रीकरणाला जुलै महिन्यात सुरुवात झाली. मात्र यात सरकारने घालून दिलेली एक महत्त्वाची अट समोर आली ती म्हणजे 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी बंदी घालण्यात आली होती. यावर अनेक ज्येष्ठ कलाकारांनी निषेध नोंदवला होता. आणि आता सरकारचा हा निर्णय मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. मुंबई हायकोर्टाने आता 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांची चित्रीकरणाला न जाण्याची बंदी उठवली आहे. तेव्हा ज्येष्ठ कलाकारांना ही आनंदाची बातमी आता मिळाली आहे.

तेव्हा 65 वर्षांवरील कलाकारांना आता चित्रीकरणासाठी सेटवर आणि स्टुडिओमध्ये जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे ज्य़ेष्ठ कलाकार आता चित्रीकरण करु शकणार आहेत. या वयोमर्यादाच्या अटीचा अनेक ज्य़ेष्ठ कलाकारांनी निषेध केला होता. मात्र आता 65 वयापेक्षा जास्त असलेलेल  कलाकार आणि क्रू मेम्ब सेटवर आणि स्टुडिओत चित्रीकरणासाठी जाऊ शकणार आहेत. 

ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना टीव्ही किंवा चित्रपट यामध्ये काम करता येत नव्हते. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा अशा व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार असल्याने त्यांची पात्र मालिकांमधून गायब झालेली दिसली होती तर काही मालिकांमध्ये अशा कलाकारांचे सीन त्यांच्या घरुन शूट केले जात होते.

Recommended

Loading...
Share