पाहा Video : रिमझिम पावसात अशी थिरकली उर्मिला कोठारे, पोस्ट केली नृत्याची झलक

By  
on  

लॉकडाउनच्या काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होमला सुरुवात केली. यात काहींनी ऑनलाईन वर्कशॉप सुरु केले. अभिनेत्री उर्मिला कोठारेनेही ऑनलाईन वर्कशॉपला सुरुवात केली आहे. उर्मिला ऑनलाईन नृत्याचे धडे देते.

नुकताच उर्मिलाने एक व्हीडीओ पोस्ट केला आहे.  रिमझिम पावसात उर्मिलाने हा व्हिडीओ शुट केला आहे. यात उर्मिलाने गणेश वंदनावर नृत्य सादर केलं आहे. आगामी वर्कशॉपमध्ये उर्मिला जे शिकवणार आहे त्याची ही छोटीशी झलक तिने पोस्ट केली आहे. 

 

उर्मिलाही एक उत्तम नृत्यांगना आहे. उर्मिलाने शास्त्रिय नृत्याचे शिक्षणही घेतलेलं आहे. सोशल मिडीयावर उर्मिला बऱ्याचदा तिचे डान्स व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. उर्मिलाने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. 

Recommended

Loading...
Share