Exclusive: सुशांतच्या ‘त्या’ मैत्रिणीने केला रियाच्या ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा खुलासा

By  
on  

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूप्रकरणातील एक बाबी आता समोर येताना दिसत आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी इतका वेळ का लावला हे देखील समोर येत आहे. सुशांतच्या एका अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली आहे. या मैत्रिणीने सुशांतशी झालेलं संभाषण त्याच्या घरच्यांशी शेअर केलं आहे. 
या चॅटमधून असं समोर आलं की सुशांतने अगदी अगतिकपणे मान्य केलं होतं की रिया त्याला ब्लॅकमेल करत आहे. याशिवाय सुशांतच्या घरी रियाचं कुटुंब सर्रास रहायला जायचं. रियाची आई संध्या तिथे नेहमी रहायची. त्यामुळे सुशांत खुप अस्वस्थ व्हायचा. 

 

त्याला रियासोबतचं हे नातं संपवायचं होतं. पण रियाने त्याला बदनाम करण्याची धमकी दिल्यावर त्याला शांत रहावं लागत होतं. याशिवाय सुशांतच्या मैत्रिणीने असंही सांगितलं की रिया त्याचा फोन सतत चेक करायची. त्यामुळे तो कुटुंबाशीही बोलू शकत नव्हता. यासोबत मैत्रिणीसोबतचं चॅटही त्याला लपवावं लागत होतं. रियाला हे समजल्यावर तिने सुशांतचं क्रेडिट कार्ड वापरून तीन फोन खरेदी केले ज्याची किंमत जवळपास 4 लाख होती. बाहेर पडताना ती दोन्ही फोन सोबत ठेवायची. 

 

यादरम्यान संध्या यांनी सुशांतच्या घरातील नोकरही बदलले होते. सुशांतने जाब विचारल्यावर हे सर्व रियाच्या इच्छेप्रमाणे सुरु असल्याचं त्याला सांगितलं गेलं. याशिवाय रियाने तिची आवडती महागडी कार खरेदी करण्यासाठी सुशांतवर दबाव टाकला. त्यातील एक कार रियाचा भाऊ शौमिक चालवत असेल. या सगळ्या घटनांना सुशांतचे भाऊजी आयपीएस अधिकारी ओ पी सिंह यांनी व्हेरिफाय केलं आहे. सुशांतचे घरचे त्याच्या मृत्यूचं कारण नेपोटिझम असल्याचं नाकारतात. त्यांना रिया आणि तिच्या कुटुंबावरच संशय आहे.

Recommended

Loading...
Share