By  
on  

या प्रसिद्ध हिंदी मालिका आता प्रथमच दिसणार मराठीत

'नागिन' ही हिंदी मालिका टेलिव्हीजन विश्वातली सगळ्यात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या रेसमध्येही ही मालिका इतर मालिकांना मागे टाकताना दिसते. पहिल्या सिझनच्या यशानंतर आता या मालिकेचं चक्क पाचवं सिझन सुरु आहे. मात्र हीच गाजलेली मालिका आणि त्याची कहाणी आता मराठी भाषिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. कारण नागिन ही मालिका आता प्रथमच मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे.

एवढच नाही तर 'कर्मफल दाता शनि' ही मालिकाही हिंदी टेलिव्हीजन विश्वात चांगलीच गाजली. आणि आता ही मालिका देखील मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. या दोन्ही मालिकांनी टेलिव्हीजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विविध विक्रमांनी नावाजलेल्या या मालिका आता पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तेव्हा या मालिका आता मराठी भाषेत पाहायला मिळणार आहेत. 

 

नुकतच कलर्स मराठी वाहिनीने सोशल मिडीयावर याविषीयीची माहिती दिली आहे. "विविध विक्रमांनी नावाजलेल्या आणि रंगतदार मनोरंजनाने बहरलेल्या दोन कहाण्या घेऊन येतोय प्रथमच मराठीमध्ये."

'नागिन' या मालिकेत अभिनेत्री मौनी रॉय मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर शनि मालिकेत बालकलाकार कार्तिकेय मालविया मुख्य भूमिकेत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive