यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी
समस्या आणि ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.
चारही मुलांची लग्न लावण्याचा घेतलाय रुक्मिणी बाईंनी ध्यास,
पण मराठवाड्यातल्या पाणी टंचाईमुळे होईल का पूर्ण त्यांच्या मनातील आस?
नविन मालिका - नवरी मिळे नवऱ्याला!
7 ऑक्टोबरपासून,
सोमवार ते शनिवार रात्री 8 वा.
फक्त सोनी मराठीवर.#नवरीमिळेनवऱ्याला । #NavriMileNavryala#SonyMarathi pic.twitter.com/QwjKsK4WRE— Sony मराठी (@sonymarathitv) September 19, 2019
सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे.
सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे नक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई होण्याची इच्छा कधीआणि कशी? पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.