Video : घराबाहेर पडलेला स्पर्धक निखिल राजेशिर्केचा किरण मानेंवर निशाणा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. तर चावडीत यशश्री आणि रोहितला महेश मांजरेकरांकडून मिळाला शब्दांचा वार. तर, या आठवड्यात ज्या सदस्यांनी गद्दारी केली त्यांना ठेचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली. ज्यामध्ये यशश्रीने अमृताचे नावं घेतले तर मेघा घाडगे यांनी किरण माने यांचे नाव घेतले तर रोहित शिंदे याने अमृता धोंगडेचे नावं घेतले. महेश सरांनी सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या आणि जे घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली बूथद्वारे तेजस्विनीला अपूर्वाची चुगली आली आणि विकासला समृद्धीची चुगली आली.  

अखेर तो क्षण आला प्रत्येक सदस्याला वाटतं असते आपण या घरामध्ये शेवट पर्यंत टिकून राहावे पण ते शक्य नसते. दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे जाणून घेण्यासाठी सगळे वाट बघत होते. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये आले ज्यामध्ये निखिल राजेशिर्के याला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share