By Devendra Jadhav | Thursday, 12 Sep, 2019
पुन्हा महाराष्ट्र खळखळून हसणार, जेव्हा पुलंच्या आठवणी रंगणार
आपल्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाच्या आठवणींनी दिवस सोनेरी होतो. असंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोनी मराठीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती.
आपल्या शब्द कोटी करण्याच्या स्वभावातून महाराष्ट्रात हशा पिकवणाऱ्या पु. लं. ना समर्पित हा कार्यक्रम ही महाराष्ट्रभर हशा पिकवण्यासाठी सज्ज आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रातले विनोदवीर विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे, समीर चौघुले इ. दिग्गज पु. लं. ची छटा रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. तर अतुल परचुरेंनी साकारलेली भाईंची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याशिवाय दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेला वाचिक अभिनय तर अरूण नलावडेंनी साकारलेली भूमिका ही या कार्यक्रमाची वैशिष्टयं आहेत.
अनुभवा पुलंच्या दर्जेदार विनोदांची मैफिल!
बघायला विसरू नका - पुलंच्या आठवणींची हास्यजत्रा!
15 सप्टेंबर रविवार, दुपारी 1 आणि संध्या. 7 वाजता.
फक्त सोनी मराठीवर. #PulanchyaAthvaninchiHasyaJatra । #पुलंच्याआठवणींचीहास्यजत्रा#SonyMarathi@SaieTamhankar.....