By | Saturday, 27 Oct, 2018

अभिनेते रवी काळे बनले घोडेस्वार

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी– हिंदीसह तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून.....

Read more

By | Friday, 26 Oct, 2018

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं सुपरहिट गाणं 'गोमू संगतीनं' पाहा नव्या रुपात

मराठी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारं गोमू  संगतीनं माझ्या तू येशील का...हे सुपरहिट गाणं नुकतंच नव्या रुपात आणि नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर झालं आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या नटश्रेष्ठांच्या जीवनपटात त्यांच्या सिनेकारकिर्दीत छाप पाडणा-या.....

Read more

By | Friday, 26 Oct, 2018

पाहा 'अश्लील उदयोग'चं पोस्टर; पर्ण पेठे-अभय महाजन प्रमुख भूमिकेत

अभिनेता- दिग्दर्शक आलोक राजवाडे यांचा अश्लील उदयोग मित्र मंडळचं नवीन पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. अश्लील उद्योग मंडळमध्ये आलोकची पत्नी आणि अभिनेत्री पर्ण पेठे व अभिेनता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहेत. मामी फिल्म फेस्टिवलला नुकतीच सुरुवात झाली.....

Read more

By | Friday, 26 Oct, 2018

‘भेटी लागी जीवा’ मालिकेत अभिनेते अरुण नलावडे यांची विशेष भूमिका

सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील मनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येक मालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकी ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. ३ पिढ्या आणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावर आधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तम मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ३ पिढ्या, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती-भवती फिरणारी ‘भेटी लागी जीवा’ची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जात आहे. आणि ही कथा तितक्याच सुंदरपध्दतीने यातील ३ पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारे कलाकार अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे. एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्याओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य. डिजेरिमिक्सच्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं. मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानीपडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवाद ही तितक्याचताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, " आशिर्वादाला ओझं समजून परत करायला आले की काय..." म्हणणाऱ्या तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्यामुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे. भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेच सर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणि तारूण्याशी नुकतीच ओख झालेला तरूण म्हणजे विहंग. मुलगा-वडील नातू अशी ही तीन पिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद,भावना यावर आधारितल ‘भेटी लागी जीवा’ मालिकेतील या तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरत जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  अरुण नलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजे यांनी त्यांच्या भूमिका इतक्याचोख पार पाडल्या आहेत की ही कथा जणू आपल्या सभोवताली घडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासून दाद देत आहेत. https://twitter.com/sonymarathitv/status/1055008385391828992 आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेली भेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पण त्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हे जाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हा विहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हा काय घडेल अन् कसं घडेल हे पाहण्यासाठी बघत राहा ‘भेटी लागी जीवा’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सोनी मराठी वर......

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

'माझा अगडबम'मध्ये झळकणार सुबोध भावेचा कान्हा

वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत बालकलाकार म्हणून अभिनयात पदार्पण करतोय कान्हा. लवकरच आगामी 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर तो येत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात गुणी अभिनेता कान्हाचे वडील सुबोध भावेदेखील असल्याकारणामुळे ही वडील आणि मुलाची .....

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही

महाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही.....

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

Photo :रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांनी असा साजरा केला सिध्दार्थ जाधवचा वाढदिवस

अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक  रोहित शेट्टी यांनी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ जाधवचा वाढदिवस साजरा केला, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. या दोघांनी मिळून सिध्दूच्या वाढदिवसानिमित्त भरपूर धम्माल.....

Read more

By | Wednesday, 24 Oct, 2018

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेलल्या 'बॉईज 2' ची अशी रंगली सक्सेस पार्टी

ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, 'बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने धावत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५.....

Read more