By | Saturday, 20 Oct, 2018

महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ‘विदर्भाचे वाघ’ टीम स्वप्नील जोशीच्या मालकीची

क्रिकेट, कबड्डी या खेळांप्रमाणे आता कुस्तीच्या खेळाची लीग देखील सुरु होणार आहे आणि आता मराठी सुपरस्टारच्या मालकीची टीम असणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

पाहा अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा 'नवदुर्गा' अवतार

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमासून ते ‘१०० डेज’ या मालिकेपर्यंत ते तू ही रे सारख्या सिनेमांमधून  प्रत्येक आव्हानात्मक भूमिकेला मोठ्या ताकदीने न्याय देणारी.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

पाहा तरूणाईला लव्ह के फंडे देणा-या 'गॅटमॅट'चा टिझर

प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा 'गॅटमॅट' राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

 सोनी मराठीवर पाहा 'विनोदाचा बादशाह लक्ष्या'

तो आला, त्यांनी पाहिलं, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला... आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका 'लक्ष्या'... दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्‍या या विनोदाच्या बादशाहाची  एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती... या कलाकाराला जाऊन तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. २६ ऑक्टोबर १९५४मध्ये जन्माला आलेल्या आणि प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्‍या या विनोदातल्या अवलियाच्या जन्मतिथीनिमित्त आदरांजली म्हणून, याबादशाहाचे सिनेमे आठवडाभर सोनी मराठी या वाहिनीवरून दाखवले जाणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डेसाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमाला 'विनोदाचा बादशाह लक्ष्या' हे नाव देण्यात आलं असून या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या धमाल सिनेमांची रंगत प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून २७ऑक्टोबरपर्यंत रोज दुपारी३ वाजता प्रेक्षक आपल्या लाडक्या लक्ष्याच्या काही अजरामर कलाकृती पाहू शकणार आहेत. यात 'एकापेक्षा एक''चिकट नवरा' 'रंग प्रेमाचा', 'लपवा छपवी' 'इजा, बिजा, तिजा' आणि 'बजरंगाची कमाल'या सिनेमांचा समावेश आहे.
गेली दोन दशकं प्रेक्षकांचं लक्ष्यावरचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही...
‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टी गाजवली. याचा प्रभाव एवढा होता की , लक्ष्याच्या हिंदीपदार्पणावेळी ‘लक्ष्या आला रे...!’ चा डंका पिटण्यात आला होता. मराठी हिंदी विनोदी नटांना पुरून उरलेल्या अशा लक्ष्याचे चित्रपट सोनी मराठीवर पाहता येणार आहेत.
तेव्हा रसिकांना हसवण्याचा विडा उचललेल्या लक्ष्याच्या जन्मतिथीनिमित्त आपल्या लाडक्या लक्ष्याच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घ्या २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरमध्ये फक्त सोनी मराठीवर...
.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

अरेच्चा ही निर्माता-दिग्दर्शकाची जोडी अगदी शेम टू शेम!

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि प्रसिध्द निर्माते दिपक राणे अगदी शेम टू शेम दिसतायत नेमकं काय आहे, यामचं रहस्य. सर्वांनाच हा प्रश्न पडला. ‘झी टॉकीज’ वाहिनीतर्फे पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात २ ते १८.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेला मिळणार का बिग बॉस12ची वाईल्ड कार्ड एन्ट्री?

पहिल्या-वहिल्या बिग बॉस मराठीच्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करत या शिर्षकावर आपलं नाव कोरलं. भाडणं, रुसवे-फुगवे आणि बिग बॉसचे टास्क या सर्वांत मेघाचा सहभाग प्रचंड महत्त्वाचा ठरला. या रिएलिटी शोमुळे.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

स्पोर्ट्स टीम विकत घेणारी पहिली मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मालकीची एखादा खेळाडू संघ असणे, आता नाविन्याचे राहिले नाही, शाहरूख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी ह्या बॉलीवूड स्टार्सच्या आयपीएलमध्ये स्वत:च्या टीम आहेत. तर अभिषेक बच्चनकडे कब्बडी टीम आहे, मात्र आता पहिल्यांदाच.....

Read more

By | Saturday, 20 Oct, 2018

पाहा मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणा-या 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा दमदार ट्रेलर

ज्यांच्या एन्ट्रीला शिट्ट्या पडत, थिएटर दणाणून जात त्या काशिनाथ घाणेकरांचा नाट्यप्रवास आणि जीवनप्रवास घडवणारा 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा दमदार ट्रेलर उलगडला आहे. काशिनाथ घाणेकर या मराठी ंरगभूमीच्या पहिल्या आणि अखेरच्या सुपरस्टारचा उदय आणि अस्त यावर सिनेमा.....

Read more