'जय मल्हार', 'विठू माऊली'नंतर कोठारे व्हिजनसाठी आदर्श शिंदेच्या आवाजातलं नवं शीर्षक गीत

By  
on  

महेश कोठार आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनच्या अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. असाच एक आगामी प्रोजेक्ट घेऊन कोठारे व्हिजन येत आहेत. त्यांच्या 'जय मल्हार' आणि 'विठू माऊली' सारख्या मालिकांच्या शीर्षक गीतासाठी गायक आदर्श शिंदेने आवाज दिला होता.

कोठारे व्हिजन पुन्हा एकदा एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. यासाठी देखील आदर्श शिंदेने शीर्षक गीत गायलं आहे. नुकतच या शीर्षक गीताचं रेकॉर्डिंग पार पडलं. यावेळी अभिनेते महेश कोठारे आणि मुलगा आदिनाथ कोठारे उपस्थित होते. 

गुलराज सिंह यांनी हे गाणं कम्पोझ केलं असून गीतकार मंदार चोळकर यांचे या गाण्याला शब्द आहेत.

 

आदर्श शिंदेने नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी माहिती दिली. तो लिहीतो की, "जय मल्हार आणि विठू माऊलीच्या मोठ्या यशानंतर आता कालच कोठारे व्हिजनसाठी आणखी एक शीर्षक गीत रेकॉर्ड केलं आहे. सुंदर पद्धतिने गुलराज सिंह याने कम्पोझ केलय आणि मंदार चोळकरने लिहीलय."

कोठाेर व्हिजन आणि आदर्श शिंदे हे कॉम्बिनेशन नेहमीच यशस्वी ठरलय. तेव्हा या आगामी प्रोजेक्टमधील हे गाणंही तसच असणार यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share