By  
on  

पाहा Video : हा अभिनेता इग्लंडमध्ये राबतोय शेतात, अशी करतोय शेती

अभिनेता सुव्रत जोशी सध्या इग्लंडमध्ये आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुव्रत हा तेथील बऱ्याच गोष्टी शेयर करतोय. सध्या तिकडचे विविध व्हिडीओ सुव्रत पोस्ट करताना दिसतोय. नुकताच सुव्रतने आणखी एक व्हिडीओ शेयर केला आहे. सुव्रतचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. याचं कारणही तसच आहे. कारण सुव्रत इग्लंडमध्ये चक्क शेतात राबतोय.

सुव्रत तिथे सध्या शेती करत असल्याचं या व्हिडीओत सांगतोय. तिथे भोपळ्याची शेती, आक्रोडची झाडं आणि अशा निसर्गरम्य वातावरणात सुव्रतची शेती सुरु आहे. या व्हिडीओमध्ये विनोदी अंदाजात या सगळ्या गोष्टी तो मजेशीर पद्धतिने सांगतोय.

 

या पोस्टमध्ये सुव्रत लिहीतो की, "काळी माती गोरी मानसं...विषय असा आहे की मी इथं गावाकडं शेती करायला गेलतो तर म्हनलं एक लाइट लाइट विडिओ होऊन जाऊ दे...आवडला तर मग शेयर मारा नुसतं एकटेच मजा मारू नका..."

याआधीही सुव्रतने गोऱ्यांच्या शेतात घाव घालतानाचा व्हिडीओ शेयर केला होता. सध्या सुव्रत तिथल्या शेतीत रमत असल्याचं यावरु पाहायला मिळतय.

 

Recommended

PeepingMoon Exclusive