छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. १९ फेब्रुवारी १६३० साली महाराजांचा जन्म झाला. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून फक्त देशातच नाही तर परदेशातही उत्साहाने साजरी केली जाते. लहान-थोर सर्वांनाच शिवजयंती दणक्यात साजरी करण्याचा उत्साह असतो. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीसुध्दा सोशल मिडीयावर एक अनोखा सेल्फी पोस्ट करत महाराजांना मानाचा मुजरा केला आहे.
महाराष्ट्रातील सृजनशील आणि सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हॉर्वर्ड विद्यापीठाकडून चर्चासत्राचं आमंत्रण होतं हे आपल्याला माहितच आहे. त्यानिमित्ताने ते परदेशातच आहेत. तेथील मराठी लोकांच्यावतीने शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी नागराज मंजुळे यांची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान महाराजांच्या वेशभूषेतील एका तरुणासोबत फोटो काढण्याचा मोह नागराज मंजुळे यांना आवरता आला नाही.
https://twitter.com/Nagrajmanjule/status/1097667111282003968