टेलिव्हीजनवर सध्या विविध विषयांवर मराठी मालिका पाहायला मिळतात. यातच 'प्रेम पॉइजन पंगा' ही मालिका लक्षवेधी ठरली. एका नागीण आणि सामान्य मुलाची प्रेम कहाणी यात पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
अभिनेत्री शरयु सोनावणे या मालिकेत इच्छाधारी नागीणीची भूमिका साकारतेय. नुकतच शरयुने सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले आहेत. नुकताच या मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. यावेळी कलाकारांनी एकत्र मिळून शेवटचा दिवस साजरा केला आहे. यावेळचे फोटो शरयुने पोस्ट केले आहे. शिवाय या मालिकेला मिळालेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, "माझ्याकडून आणि प्रेम पॉयझन पंगा च्या संपूर्ण टीम कडून तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला छान प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम केलं, तसच जुई वर खूप प्रेम केलं आणि याच प्रेमासोबत आम्ही आज निरोप घेतोय. मराठी मध्ये पहिल्यांदाच नागीण ही संकल्पना होती आणि ती भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली त्यासाठी झी युवा आणि कोठारे व्हिजन चे मनापासून आभार.."