अभिनेता वैभव मांगले यांची चित्रकला सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चेत आली. मात्र त्यांनी याचा वापर चांगल्या कार्यासाठी करायचं ठरवलं. त्यांनी लॉकडाउनच्या काळात आणि आता अनेक सुंदर चित्रे साकारली. आणि ही चित्रे त्यांनी विकायचं ठरवलं. अनेकांनी वैभव यांची चित्रे विकत घेतली. यात काही कलाविश्वातील कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता सुबोध भावेनेही वैभव मांगलेंकडून एक चित्र घेतलं. याविषयी वैभव मांगले यांनी पोस्टही केली आहे. मात्र या पोस्टमध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट देखील सांगीतली आहे.
वैभव मांगले यांनी सुबोध भावे याने दाखवलेल्या माणुसकीचं उदाहरण या पोस्टमध्ये सांगीतलं आहे. सुबोधने चक्क दहा वर्षांपूर्वी केलेल्या एका इव्हेंटचे पैसे वैभव मांगलेला देऊ केले. ज्या कार्यक्रमाचा वैभव यांनादेखील विसर पडला होता त्या कार्यक्रमाचे पैसे सुबोध देण्याची माणुसकी दाखवली.
वैभव या पोस्टमध्ये लिहीतात की, "आज माझा मित्र ..आणि उत्तम अभिनेता सुबोध भावे याने माझे चित्र घेतले ... सुबोध धन्यवाद !!! अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट इथे सांगायची आहे . अचानक काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला त्याचा ... कृपया अकाउंट नंबर दे एका इव्हेंट चे पैसे पाठवायचेत ... म्हटलं कुठला इव्हेंट ... तर 10 वर्षा पूर्वी आम्ही ठाण्यात एक इव्हेंट केला होता . आणि आता सुबोध ने तो इव्हेंट एका चॅनल दिला ... कारण आताच्या वाईट काळा मध्ये लोकांना तेवढीच मदत होईल .. या हेतूने त्याने चॅनल ला दिला आणि आलेले पैसे त्याने प्रत्येकाला दिले . त्यात इव्हेंट मध्ये असे खूप लोक होते .. कि त्यांना आता जी काही रक्कम सुबोध ने त्यांना दिली ती खूप मोलाची मदत ठरली त्यांच्या साठी ...इथे "आता"केलेल्या कामाचे पैसे लोक देत नाहियेयेत ... आणि सुबोध ने तर 10 वर्ष पूर्वी त्या इव्हेंट चे पैसे दिलेच होते ... पण आता चॅनल दिल्यावर हि त्याला मिळालेल्या पैशातून प्रयेकाला पैसे दिले .... नसते दिले तर कुणाच्या लक्षात हि आले नसते .... कुणी विचारायला हि गेला नसतं ... पण माणुसकी ... आणि मोठं मन लागत हे सगळं करायला .... धन्यवाद सुबोध"