शनायाच्या आईचं फॅन फॉलोविंग, केला हा धमाल व्हिडीओ

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या सेटवर कलाकारांची धमाल ऑफस्क्रिन मस्तीही पाहायला मिळते. सोशल मिडीयावर या मालिकेतील कलाकार सेटवरील विविध गोष्टी पोस्ट करताना दिसतात. सेटवरील धमाल व्हिडीओ हे कलाकार सोशळ मिडीयावर पोस्ट करताना दिसतात. 

अभिनेत्री किशोरी आंबिये या मालिकेत शनायाच्या आईची भूमिका साकारत आहेत. इतर तरुण कलाकारांप्रमाणे त्या देखील सेटवर धमाल करतात. नुकताच किशोरी यांनी सोशल मिडीयावर त्यांचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओत किशोरी आंबिये आणि त्यांचा फॅन आहे. फॅन म्हणजे चाहता नाही तर चक्क पंखा घेऊन त्यांनी हा फॅन फॉलोविंगचा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत शनाया म्हणजेच रसिका सुनील आणि अभिनेता अभिजीत गुरुदेखील आहेत.

सोशल मिडीयावर या कलाकारांचा हा मजेशीर व्हिडीओ पसंत केला जातोय.

Recommended

Loading...
Share