'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे सारी लुक एकदा पाहाच

By  
on  

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी कळालय. आणि त्यानंतर अरुंधती पुढे काय पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नुकताच या मालिकेत लग्नसोहळ्याचा माहोल पाहायला मिळाला होता. यावेळी मालिकेतील सगळे कलाकार या सोहळ्यासाठी नटताना दिसले होते.

या मालिकेत संजनाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रुपाली भोसले देखील मालिकेतील लग्नसोहळ्याच्या सीनसाठी नटली होती. या साडी लुकमधील फोटो रुपालीने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.रुपालीच्या चाहत्यांनाही रुपालीचा हा साडी लुक प्रचंड आवडला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाच्या भूमिकेसाठी रुपालीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  याआधी अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाच्या भूमिकेत होती. मात्र काही कारणास्तव दिपालीने  ही मालिका सोडल्यानंतर त्याजागी रुपाली ही भूमिका साकारत आहे.

Recommended

Loading...
Share