पाहा Video : 'नच बलिये'च्या मंचावर अमृताने असा घातला होता हिमांशुच्या गळ्यात हार

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि पति हिमांशु मल्होत्रा ही जोडी 'नच बलिये' या डान्स शोच्या सातव्या पर्वाची विजेती जोडी ठरली होती. या जोडीने नच बलियेच्या मंचावर एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिले होते. या जोडीच्या डान्ससोबतच मंचावरील या दोघांची मस्तीही धमाल असायची.

नुकतच हिमांशुने या आठवणींना उजाळा दिला आहे. हिमांशुने नच बलियेच्या मंचावरील एक मस्तीचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत अमृता नेम लावून हिमांशुच्या गळ्यात कसा हार घालते हे पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Revisiting NACH BALIYE MEMORY️️ @amrutakhanvilkar #treasure #love #happiness #smiles

A post shared by Himanshu ASHOK Malhotra (@himanshuashokmalhotra) on

 

2015मध्ये हिमांशु आणि अमृताचा लग्नसोहळा पार पडला होता. त्याआधी बरीच वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. 

सोशल मिडीयावर अमृता आणि हिमांशु या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. हिमांशुने नुकताच पोस्ट केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Recommended

Loading...
Share