'रंग माझा वेगळा' मधील दीपाने खऱ्या आयुष्यातील हे फोटो केले पोस्ट

By  
on  

'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लक्षवेधी ठरत आहे. वर्णभेद करणारी सौंदर्या इनामदार आणि तिची सून दीपा यांच्यातील टॉम एन्ड जेरी सारखी वाटणारी नोकझोक या मालिकेत पाहायला मिळते. तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिकचं फुलत जाणार प्रेमही पाहायला मिळतं. दीपाप्रमाणे आता कार्तिकलाही आई सौंदर्या इनामदारचं सत्य कळालं आहे. त्यामुळे तिच्या मनातून काळ्या रंगाच्या व्यक्तिंविषयी असणारा द्वेष कसा निर्माण झाला याचा शोध कार्तिक आणि दीपा घेत आहेत.

या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे दीपाच्या भूमिकेत आहे. या मालिकेसाठी रेश्मा काळ्या रंगाचा मेकअप करते. मालिकेत जरी ती तशी दाखवली असली तरी खऱ्या आयुष्यातील रेश्माचे फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. रेश्माने तिचे मेकअप नसलेले काही फोटो नुकतेच सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. तिच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले आहेत.

'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिएलिटी शोमध्ये रेश्मा झळकली होती. रेश्माने याआधीही अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. शिवाय रेश्माने हिंदी मालिकेतही काम केलेलं आहे.

Recommended

Loading...
Share