'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतोय. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतात. विशेषकरून अभिनेता समीर चौगुले यांचे परफॉर्मन्सही लक्षवेधी ठरतात. त्याचं विनोदाचं उत्तम टायमिंग आणि जबरदस्त अभिनयाचे आता असंख्य चाहते झाले आहेत. समीर यांचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Upcoming hindi film ..My first one.....#gulluShadiMubarak .....Coming soon .......

A post shared by Samir Choughule (@samirchoughule) on

 

विनोद कार्यक्रम, मराठी सिनेमे, नाटक केल्यानंतर समीर चौगुले आता चक्क हिंदी सिनेमात झळकणार आहेत. समीर यांनी नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली. गुल्लु शादी मुबारक या हिंदी सिनेमात समीर चौगुले झळकणार आहेत. हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा असेल. या सिनेमातील त्यांचा सीनमधील फोटो पोस्ट करून त्यांनी याविषयी सोशल मिडीयावर सांगीतलं आहे.

या सिनेमात समीर चौगुले हे अभिनेता अतुल श्रीवास्तवा यांच्यासोबत स्क्रिन शेयर करताना दिसतील.

Recommended

Loading...
Share