By  
on  

स्पृहा जोशीने शेयर केल्या 'अटकन चटकन'च्या सेटवरील या आठवणी

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे काही सिनेमे आता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येत आहे. यापैकीच एक म्हणजे 'अटकन चटकन' हा सिनेमा. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. शिवाय या सिनेमातील अभिनेत्री स्पृहा जोशीची भूमिकाही लक्षवेधी ठरतेय.

स्पृहा जोशीने नुकतच या सिनेमाच्या सेटवरील काही खास क्षण सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये स्पृहा तिच्या चाहत्यांना या सिनेमाविषयी विचारत आहे. ती लिहीते की, "तुम्ही अटकन चटकन पाहिला का ?"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Have you watched #AtkanChatkan... Streaming now on @zee5premium . #ott #film #streaming #atkanchatkanonzee5

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

अभिनेत्री स्पृहा जोशीचा आता मराठीसह हिंदीतही चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'रंगबाज फिरसे' या हिंदी वेबसिरीजमध्ये स्पृहा अभिनेती जिमी शेरगिलसोबत झळकली होती. शिवाय तिची अटकन चटकनची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली आहे. येत्या काळातही स्पृहा तिच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive