स्वप्नील जोशी झाला आम आदमी, नव्या सिनेमातील लूक केला शेअर

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगल्या व्यक्तिरेखा साकारण्यात माहीर आहे. तो कधी mpm3 मधला रोमॅंटिक नवरा असतो तर कधी रणांगणमधील सुडाने पेटलेला नायक. हलक्या-फुलक्या भूमिकांसह सिरीअस भूमिकांमध्येही स्वप्नील भाव खाऊन जातो.

https://twitter.com/taran_adarsh/status/1098083459191341056

स्वप्नीलचा आणखी एक नवा लूक सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या लूकमध्ये स्वप्नील फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. लाल कलरच्या स्कूटरवर लाल रंगाचं हेल्मेट घातलेला स्वप्नील एखाद्या ऑफिसला चाललेल्या ‘फॅमिली मॅन’ प्रमाणे दिसत आहे. ‘मोगरा फुलला’ असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. स्वप्नीलचा हा नवा सिनेमा कसा असेल याची चाहत्यांना उत्सुकता असेल यात शंका नाही. श्रावणी देवधर या सिनेमाच्या दिग्दर्शक आहेत. अर्जुन सिंग आणि कार्तिक निशाणदार या सिनेमाचे निर्माते आहेत.

https://www.instagram.com/p/BuF4DcylOOc/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Loading...
Share